Friday, 2 January 2015

आंबेडकरी चळवळीतील कवी,गायक ,शाहीर ज्ञानेश पुणेकर यांचा खा. रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार

औषधोपचारांसाठी केली रोख पन्नास हजार रुपयांची मदत.


संगीताच्या माध्यमातुन प्रबोधन करणारे आंबेडकर चळवळीतील कवी,गायक,शाहीर श्री ज्ञानेश पुणेकर यांचा रि.पा.इ (अे) च्या वतिने खा रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच त्यांना नांदेड येथील उद्योजक व रि.पा.इ चे महाराष्ट्र उपाध्यक्ष भिमराव शिरसा़गर यांच्या सहकार्याने रोख पन्नास हजार रुपयांची मदतही करण्यात आली. आपल्या काव्यातुन दलीतांवरील अत्याचार दुर व्हावे तसेच तरुणांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी यासाठी  शाहीर ज्ञानेश पुणेकर यांनी भरीव काम केले.आता या उतारवयात मानधन म्हणुन औषधोपचारासाठी रोख ५०,००० हजार रुपयांची मदत त्यांना करण्यात येत असल्याचे आठवले यांनी सांगीतले.

पी के चित्रपटाबद्दल होत असलेल्या निदर्शनांबद्दल पत्रकारांनी छेडले असता रामदास आठवले म्हणाले की  हा चित्रपट हिदू-धर्म विरोधी नाही तर धर्मा-धर्मात असलेल्या अनिष्ट चालिरितींविरुद्ध आहे.आर पी आयचा या चित्रपटाला विरोध नाही.तसेच आम्ही मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या भुमिकेशी सहमत आहोत व हा चित्रपट एक चांगली कलाकृती आहे .

नविन वर्षात मंत्रीमंडळ विस्तारात आम्हाला दिलेल्या आश्वासनानुसार केद्रात मंत्रीपद व राज्यात ५ टक्के सहभाग असेल अशी आशा आहे.मला केद्रीय मंत्रीपद मिळावे अशी माझ्या पक्षाची व माझी ईच्छा आहे.आता देशभरातील लोकांसाठी काम करण्याची ईच्छा आहे असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले.

आज सकाळी शरद पवारांशी झालेल्या भेटी बद्दल बोलताना सांगीतले कि हि राजकीय भेट नव्हती ,शरद पवार हे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत व माझे जवळचे मित्र आहेत.गेले महिनाभर ते आजारी होते त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याबद्दल विचारपुस करण्यासाठी गेलो होतो.

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाबद्दल बोलताना रामदास आठवले म्हणाले हे स्मारक गेली दहावर्षे रखडले आहे .मच्छीमार संघटणांनी आपला विरोध मागे घ्यावा तसेच ज्याकाही तांत्रीक अडचणी असतील त्यावर मार्ग काढुन स्मारक त्याच ठिकाणी व्हावे अशी आशा व्यक्त केली.



No comments:

Post a Comment