Tuesday, 30 December 2014

डॉ.रघुनाथ माशेलकर यांना सदगुरु वामनराव पै जीवनगौरव सन्मान

मुंबई,१०डिसेंबर(प्रतिनिधी)- जीवनविद्या मिशन या सेवाभावी संस्थेतर्फे
जेष्ठ वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर यांना सदगुरु श्री वामनराव
पै जीवनगौरव सन्मान हा पुरस्कार जाहिर झाला आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा
१४ डिसेंबर रोजी रविंद्र भवन, गोवा येथे जीवनविद्या मिशन आयोजीत
व्याख्यानमालेत होणार आहे.
आपले संपुर्ण आयुष्य वैज्ञानिक द़ृष्टिने लोकांची अज्ञान व अंघश्रद्धा
नष्ट करत ज्ञानदान व वैचारिक क्रांतीद्वारे समाज परिवर्तन घडवणाऱ्या
सदगुरु श्री वामनराव पै यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार देण्यात
येणार आहे.
डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या विज्ञान क्षेत्रातील भरीव योगदाना बद्दल
त्यांना हा पुरस्कार देणार असल्याचे आयोदकांनी सांगीतले.पुरस्कार
मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत या व्याख्यानमालेला उपस्थित रहाणार
असल्याचा मनोदय डॉ माशेलकर यांनी व्यक्त केला आहे


No comments:

Post a Comment