भारताच्या मोष्ट वाॅंटेड लिष्ट मधे असलेला अंडरवर्ल्ड डॅान दाऊद इब्राहिम याला पाकिस्तानने भारताच्या हवाली करावे अन्यथा भारताने कराची मधे जाउन दाऊदला ताब्यात घ्यावे अशी मागणी आरपीआय अध्यक्ष खा रामदास आठवले यांनी केली आहे
दोन्ही देशातील संबंध सुधारण्याच्या दृष्टिने कराचीत लपलेल्या दाऊद इब्राहिमला पाकिस्तानने भारताच्या हवाली करावे अन्यथा ज्याप्रमाणे अमेरिकेने पाकिस्तानात जाऊन ओसामाबीन लादेनवर कारवाई केली त्याच प्रकारे भारतानेही कराचीत जाऊन दाऊदला ताब्यात घ्यावे असे रामदास आठवले म्हणाले
मुंबईत १९९३ साली बाॅम्बस्फोटांची मालिका घडवणारा दाऊद इब्राहिम हा कराचीतील क्लिफटन या अत्यंत पाॅश परिसरात रहात असल्याचे वृत्त नुकतेच प्रदर्शित झाले होते त्यावर पाकिस्तानने दाऊदला भारताच्या ताब्यात द्यावे अशी मागणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे .
No comments:
Post a Comment