पक्षांच्या संरक्षणासाठी जनजाग्रृतीचा नाविन्यपुर्ण उपक्रम
आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया(A) च्या वतिने पक्षाचे जनसंपर्क प्रमुख मयुर बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष्यांच्या संरक्षणासाठी “लेट मी फ्लाय” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पतंग उडवताना वापरलेल्या मांज्यामुळे आकाशात उडणाऱ्या पक्षांचा हकनक बळी जातो. यासाठी जनजाग्रृती होण्यासाठी मुंबई शिवाजी टर्मीनस जवळील सिग्नल जवळ अनेक लहान मुलांनी पक्षांचा वेश परिधान करुन मकरसंक्रांतीच्या लाडुंचे वाटप केले व पतंग न उडवण्याचा किंवा उडवताना न तुटणारा धारदार मांजा न वापरण्याचे आवाहन केले. बऱ्याचदा लहान मुलांचे जीव पतंग उडवताना गेलेच आहेत आता तर मुक्या पक्षांनासुद्धा पतंगाचा त्रास भोगावा लागत आहे. देशात शेकडो पक्षी पतंगांच्या मांजामुळे कापण्याने मरण पावत आहेत. मांजामुळे मेलेले पक्षी कुठेतरी पडतात आणि त्यांची दखल कोणी घेत नाही. काही पक्षी जखमी होऊन पडतात आणि त्यांना अनंत यातना सहन कराव्या लागतात.
पतंग उडवण्यामुळे पक्ष्यांना आणि प्रसंगी माणसांनाहोणा-या त्रासाबद्दल अनेक माध्यमांतून जनजागृतीचे प्रयत्न होत आल्येत. माणसं पतंग उडवायचं थांबायच्या ऐवजी पक्ष्यांना अधिकच घातक ठरणारे मांजे वापरायला लागले आहेत. यासाठी जनजाग्रृती होउन असे प्रकार थांबावेत यासाठी या उपक्रमाचे आयोजन रिपाईच्या वतिने करण्यात आले. यावेळी मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे,अकोला जिल्हाध्याक्ष अशोक नागदीवे,युवक सरचिटणीस सचिन मोहिते व मोठ्या संख्येने पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment