Monday, 12 January 2015

रिपब्लिकन पक्षाच्या वतिने पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन सभा.

 १५ जानेवारी रोजी होणार जाहिर अभिवादन सभा.

मुंबई दि.१२ जानेवारी २०१५

पॅंथर नेते पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पक्षनेते मा. खासदार रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि. १५ जानेवारी २०१५ रोजी सायं ५ वा आझाद मैदान येथील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालया समोरील हॉलमध्ये जाहिर अभीवादन सभेचे आयोजन केले असल्याची माहिती आज मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली

दलित पॅंथर या संघटनेच्या निर्मितीतून नामदेव ढसाळ यांनी हजारो तरुणांचा आत्मविश्र्वास जागा केला, अन्याय अत्याचारा विरूद्ध लढण्याची प्रेरणा दिली.नामदेव ढसाळांच्या माध्यमातुन आंबेडकरी साहित्याने मराठी साहित्याच्या बंद दरवाजावर जोरदार धडक मारली.दलित-शोषीतांच्या वेदनांचा आक्रोश कवितेच्या माध्यमातुन जगभर नेला.अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या आठवणी जागवण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत,पत्रकार भाऊ तोरसेकर,अविनाश महातेकर,सुमंतराव गायकवाड,उत्तम खोब्रागडे,तानसेन ननावरे,पी.के.जैन,उमाकांत रणधीर,कमलेश यादव आदी वक्ते उपस्थित राहतील.दिवंगत नामदेव ढसाळ यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान लक्षात घेता रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकत्यांनी प्रचंड संख्येने या अभिवादन सभेस उपस्थित रहावे असे आवाहनही गौतम सोनावने यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

No comments:

Post a Comment