Friday, 30 January 2015

मुस्लिम समाजातील मागासलेल्या व वंचीत घटकांना आरक्षण लागू करावे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे- पाटील यांची मागणी.

प्रसिद्धीसाठी

दिनांक २९-१-२०१५

 

मुस्लिम समाजातील मागासलेल्या व वंचीत घटकांना आरक्षण लागू करावे

विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे- पाटील यांची मागणी.

 

मुंबई दि.२९.प्रतिनिधी- मुस्लिम समाजातील मागासलेल्या व वंचीत घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा आरक्षण लागू करावे, अशी मागणी आज विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजातील मागासलेल्या विविध घटकांना आरक्षण देण्याबाबत दि.९ जुलै २०१४ रोजी शासनाने अध्यादेश काढला होता.या अध्यादेशाच्या विरोधात काही लोक उच्च न्यायालयात गेले होते.माननीय उच्च न्यायालयाने याबाबत अंतरिम निकाल देताना मुस्लिम समाजातील मागासलेल्या विविध घटकांना फक्त शिक्षण क्षेत्रापुरतेच आरक्षण देण्यासाठी मान्यता दिलेली आहे.या अध्यादेशाच्या कालावधीस सहा महिने उलटुन गेल्याने अध्यादेशाची मुदत संपली अाहे त्यामुळे सदर आरक्षणाचा लाभ मुस्लिम समाजास मिळत नाही. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लिमांना  शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असल्याने मुस्लिम समाजाच्या न्याय मागणीसाठी आदेश देण्यात यावे असे निवेदन यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.

यावेळी शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अब्दूल सत्तार, अमित देशमुख, नसीम खान आदी कॉंग्रेसचे नेते उपस्थित होते.

Monday, 19 January 2015

राज्याला स्वतंत्र पुर्णवेळ गृहमंत्री असावा ,विरोधी पक्षनेते राधाक़ृष्ण विखे पाटील यांनी केली मागणी.


मुंबई दि 19-कोसळलेली कायदा-सुव्यवस्था व अस्थीरतेचे वातावरणामुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असुन राज्याला स्वतंत्र पुर्णवेळ गृहमंत्री असावा अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाक़ृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.
नगर जिल्ह्यात जामखेडमधल्या नितीन आगे हत्याकांड,जवखेड येथील तिहेरी हत्याकांड,सोनई हत्याकांड यासारख्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटणा घडल्या असून राज्यात अट्रोसीटीच्या घटणांमधे मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे.अंबेजोगाई येथे परप्रांतातून ऊसतोडणीसाठी सुगाव येथे आलेल्या कुटुंबातील सात सदस्यांना मुकादमाने डांबून ठेवल्यानंतर या कुटुंबातील १७ वर्षीय मुलीवर चार दिवस सामूहिक अत्याचार झाला.पिंपरी चिंचवड येथील तरुणांकडून होत असलेली छेडछाड व पोलासांकडून मिळत नसलेल्या प्रतिसादामुळे 15 वर्षीय मुलीने केलेली आत्महत्या यातच दोषींना अटक करण्यात व त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात जिल्हा प्रशासन, पोलिसांना अपयश येत आहे. त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. राज्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याचा निषेध करत आहे राज्याची हि अवस्था पाहता राज्याला कायम स्वरुपी गृहमंत्री असलाच पाहीजे अशी वेळ आल्याचे विखे पाटील म्हणाले एवढेच नाही तर हि जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असुन त्यांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशा मागणी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

लेखक दिग्दर्शक इकबाल दुर्राणी,हेमंत बिर्जे,अभिनेता के.के.गोस्वामी यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश


मुंबई-दि.१९- सुप्रसिद्ध सिने-लेखक आणि दिग्दर्शक इकबाल दुर्राणी आणि ़टारझन फेम अभिनेता हेमंत बिर्जे तसेच चित्रपट व टिव्ही अभिनेते केके गोस्वामी यांनी खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया(A) या पक्षात प्रवेश केला.

खासदार आठवले यांच्या नेतृत्वा खालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया(A) हा सर्वसामान्यांचा व सर्वसामावेशक असा पक्ष असुन आमचा रामदास आठवले यांच्यावर विश्र्वास आहे अशा शब्दात  इकबाल दुर्राणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.त्यांना पार्टी तर्फे झारखंड ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.तसेच यावेळी मायावी नगरी या वृत्तपत्राचे संपादक सावन कपूर व मुंबई ग्लोबल या हिंदी वृत्तपत्राचे संपादक राजकुमार तिवारी,कॅांग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते आऱ एन अवस्थी व अभिनेत्री ख्वाहिश यांनी सुदधा आज रिपब्लिकन पक्षात अधीकृत प्रवेश केल्याचे रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष खा रामदास आठवले यांनी एम आय जी क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.

     अजय देवगण फुल और काटे ,अक्षय कुमारचा पहिला चित्रपट असलेला सौगंध ,शाहरुख खानचा दिल आशना हेै ,अामिरखानचा आतंक हि आतंक,रानी मुखर्जीचा पहिला चित्रपट मेहेंदी,मामुटी यांचा धरतीपुत्र ईत्यादी ६५ सिनेमांचे लेखन इकबाल दुर्राणी यांनी केले आहे .तसेच खुद्दार ,बेताज बादशहा ईत्यादी चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन  केले आहे.

Tuesday, 13 January 2015

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया(A) च्या वतिने“लेट मी फ्लाय” चे आयोजन


पक्षांच्या संरक्षणासाठी जनजाग्रृतीचा नाविन्यपुर्ण उपक्रम

आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया(A) च्या वतिने पक्षाचे जनसंपर्क प्रमुख मयुर बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष्यांच्या संरक्षणासाठी लेट मी फ्लाय या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पतंग उडवताना वापरलेल्या मांज्यामुळे आकाशात उडणाऱ्या पक्षांचा हकनक बळी जातो. यासाठी जनजाग्रृती होण्यासाठी मुंबई शिवाजी टर्मीनस जवळील सिग्नल जवळ अनेक लहान मुलांनी पक्षांचा वेश परिधान करुन मकरसंक्रांतीच्या लाडुंचे वाटप केले व पतंग न उडवण्याचा किंवा उडवताना न तुटणारा धारदार मांजा न वापरण्याचे आवाहन केले. बऱ्याचदा लहान मुलांचे जीव पतंग उडवताना गेलेच आहेत आता तर मुक्या पक्षांनासुद्धा पतंगाचा त्रास भोगावा लागत आहे. देशात शेकडो पक्षी पतंगांच्या मांजामुळे कापण्याने मरण पावत आहेत. मांजामुळे मेलेले पक्षी कुठेतरी पडतात आणि त्यांची दखल कोणी घेत नाही. काही पक्षी जखमी होऊन पडतात आणि त्यांना अनंत यातना सहन कराव्या लागतात.

पतंग उडवण्यामुळे पक्ष्यांना आणि प्रसंगी माणसांनाहोणा-या त्रासाबद्दल अनेक माध्यमांतून जनजागृतीचे प्रयत्न होत आल्येत. माणसं पतंग उडवायचं थांबायच्या ऐवजी पक्ष्यांना अधिकच घातक ठरणारे मांजे वापरायला लागले आहेत. यासाठी जनजाग्रृती होउन असे प्रकार थांबावेत यासाठी या उपक्रमाचे आयोजन रिपाईच्या वतिने करण्यात आले. यावेळी मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे,अकोला जिल्हाध्याक्ष अशोक नागदीवे,युवक सरचिटणीस सचिन मोहिते व मोठ्या संख्येने पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.  

 


Monday, 12 January 2015

रिपब्लिकन पक्षाच्या वतिने पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन सभा.

 १५ जानेवारी रोजी होणार जाहिर अभिवादन सभा.

मुंबई दि.१२ जानेवारी २०१५

पॅंथर नेते पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पक्षनेते मा. खासदार रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि. १५ जानेवारी २०१५ रोजी सायं ५ वा आझाद मैदान येथील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालया समोरील हॉलमध्ये जाहिर अभीवादन सभेचे आयोजन केले असल्याची माहिती आज मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली

दलित पॅंथर या संघटनेच्या निर्मितीतून नामदेव ढसाळ यांनी हजारो तरुणांचा आत्मविश्र्वास जागा केला, अन्याय अत्याचारा विरूद्ध लढण्याची प्रेरणा दिली.नामदेव ढसाळांच्या माध्यमातुन आंबेडकरी साहित्याने मराठी साहित्याच्या बंद दरवाजावर जोरदार धडक मारली.दलित-शोषीतांच्या वेदनांचा आक्रोश कवितेच्या माध्यमातुन जगभर नेला.अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या आठवणी जागवण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत,पत्रकार भाऊ तोरसेकर,अविनाश महातेकर,सुमंतराव गायकवाड,उत्तम खोब्रागडे,तानसेन ननावरे,पी.के.जैन,उमाकांत रणधीर,कमलेश यादव आदी वक्ते उपस्थित राहतील.दिवंगत नामदेव ढसाळ यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान लक्षात घेता रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकत्यांनी प्रचंड संख्येने या अभिवादन सभेस उपस्थित रहावे असे आवाहनही गौतम सोनावने यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Friday, 2 January 2015

आंबेडकरी चळवळीतील कवी,गायक ,शाहीर ज्ञानेश पुणेकर यांचा खा. रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार

औषधोपचारांसाठी केली रोख पन्नास हजार रुपयांची मदत.


संगीताच्या माध्यमातुन प्रबोधन करणारे आंबेडकर चळवळीतील कवी,गायक,शाहीर श्री ज्ञानेश पुणेकर यांचा रि.पा.इ (अे) च्या वतिने खा रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच त्यांना नांदेड येथील उद्योजक व रि.पा.इ चे महाराष्ट्र उपाध्यक्ष भिमराव शिरसा़गर यांच्या सहकार्याने रोख पन्नास हजार रुपयांची मदतही करण्यात आली. आपल्या काव्यातुन दलीतांवरील अत्याचार दुर व्हावे तसेच तरुणांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी यासाठी  शाहीर ज्ञानेश पुणेकर यांनी भरीव काम केले.आता या उतारवयात मानधन म्हणुन औषधोपचारासाठी रोख ५०,००० हजार रुपयांची मदत त्यांना करण्यात येत असल्याचे आठवले यांनी सांगीतले.

पी के चित्रपटाबद्दल होत असलेल्या निदर्शनांबद्दल पत्रकारांनी छेडले असता रामदास आठवले म्हणाले की  हा चित्रपट हिदू-धर्म विरोधी नाही तर धर्मा-धर्मात असलेल्या अनिष्ट चालिरितींविरुद्ध आहे.आर पी आयचा या चित्रपटाला विरोध नाही.तसेच आम्ही मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या भुमिकेशी सहमत आहोत व हा चित्रपट एक चांगली कलाकृती आहे .

नविन वर्षात मंत्रीमंडळ विस्तारात आम्हाला दिलेल्या आश्वासनानुसार केद्रात मंत्रीपद व राज्यात ५ टक्के सहभाग असेल अशी आशा आहे.मला केद्रीय मंत्रीपद मिळावे अशी माझ्या पक्षाची व माझी ईच्छा आहे.आता देशभरातील लोकांसाठी काम करण्याची ईच्छा आहे असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले.

आज सकाळी शरद पवारांशी झालेल्या भेटी बद्दल बोलताना सांगीतले कि हि राजकीय भेट नव्हती ,शरद पवार हे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत व माझे जवळचे मित्र आहेत.गेले महिनाभर ते आजारी होते त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याबद्दल विचारपुस करण्यासाठी गेलो होतो.

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाबद्दल बोलताना रामदास आठवले म्हणाले हे स्मारक गेली दहावर्षे रखडले आहे .मच्छीमार संघटणांनी आपला विरोध मागे घ्यावा तसेच ज्याकाही तांत्रीक अडचणी असतील त्यावर मार्ग काढुन स्मारक त्याच ठिकाणी व्हावे अशी आशा व्यक्त केली.