मुंबई दि.२७.-जवखेडा खालसा हत्याकांडाच्या निषेधार्थ तसेच इंदू मिलमध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम ५ डिसेंबरपुर्वी सुरु करावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाच्यावतीने रिपाइचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आज चैत्यभूमि,दादर ते इंदूमिल पर्यत भव्य मोर्चा काढण्यात आला.
राज्यभरातुन जवळ जवळ १५००० कार्यकर्तेे या मोर्चात सहभागी झाले होते
मुख्यमंत्री दुष्काळी दौऱ्यावर असल्याने सरकारच्या वतिने महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे यांनी इंदू मिल येथे रिपाइचेे राष्ट्रीय अध्यक्ष खा.रामदास आठवले यांच्याकडून मागण्यांचे निवेदन स्विकारले व लवकरात लवकर या मागण्यांवर बैठक बोलवण्याचे आश्वासन दिले.
सरकार हे भिमसैनिकांचे असुन त्यांच्या मागण्या स्विकारण्यासाठी सरकारच त्यांच्या व्दारी आले आहे
हा मोर्चा २८ तारखे ऐवजी १ किंवा २ तारखेला झाला असता तर सरकारमधील एखादा मंत्रीही येथे दिसला असता.इंदूमिलच्या जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक करणार अन्य कुठल्याही कारणासाठी हि जमिन वापरली जाणार नाही असे केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले आहे अाता लवकरात लवकर लोकसभा व राज्यसभेत प्रस्ताव मंजुर करुन घेण्यात येउन १४ एप्रिल ला भुमीपुजन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले तसेच
जवखेडा खालसा दलित हत्याकांडाचा तपास अंतीम टप्प्यात असुन पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे व लवकरच आरोपींना अटक होइए असे आश्वासन दिले
रामदास आठवले म्हणाले बाबासाहेब आंबेडकर हे महासागरासारखे होते म्हणुन या महासागराला साक्षी ठेवुन सांगतो की इंदूमिलच्या या सागरकिनारी महासागरासारख्या विद्वान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य व जागतिक स्मारक व्हावे
सरकार कडून बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटणेला हात लावला जाणार नाही असे आश्वासन मिळाले आहे.
हा मोर्चा राज्य वा केंद्र सरकार विरोधी नाही तर मागण्यांसाठी काढण्यात आला आहे
आम्ही नक्षलवादी नसुन नक्षलवादी भूमिका आम्हाला मान्य नाही
राष्ट्र एकसंध रहावे हिच आमची धारणा आहे
आमच्यावर हल्ले होत आहेत ज़र कुणी आमुचे संरक्षण करु शकणार नसेल तर दलीतांना स्वताच्या स्वसंरक्षणासाठी हत्यारांचे परवाने द्या
बुद्धाच्या काळात स्वसंरक्षणासाठी कराटेचा वापर होत होता.
जवखेडा खालसा दलित हत्याकांडातील आरोपींनाा त्वरित अटक होण्यासाठी त्याचा तपास सीबीआयकडे सोपवा आणि अहमदनगर जिल्ह्याला अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणुन जाहीर करा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदूमिल मधील राष्ट्रीय स्मारकाचे काम ५ डिसेंबरपुर्वी सुरु करा व या जागेचे हस्तांतरण विधेयक संसदेत त्वरीत मंजुर करा इत्यादी मागण्यांचे निवेदन पक्षाच्या वतीने देण्यात आले.