LIVE AMBIENCE
आपल्या सभोवताली घडणा-या गोष्टी
Saturday, 31 October 2015
कामातुन आनंद देणे व कामातून आनंद मिळवणे हाच खरा कर्मयोग- प्रल्हाद पै
Friday, 30 January 2015
मुस्लिम समाजातील मागासलेल्या व वंचीत घटकांना आरक्षण लागू करावे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे- पाटील यांची मागणी.
Monday, 19 January 2015
राज्याला स्वतंत्र पुर्णवेळ गृहमंत्री असावा ,विरोधी पक्षनेते राधाक़ृष्ण विखे पाटील यांनी केली मागणी.
लेखक दिग्दर्शक इकबाल दुर्राणी,हेमंत बिर्जे,अभिनेता के.के.गोस्वामी यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश
मुंबई-दि.१९- सुप्रसिद्ध सिने-लेखक आणि दिग्दर्शक इकबाल दुर्राणी आणि ़टारझन फेम अभिनेता हेमंत बिर्जे तसेच चित्रपट व टिव्ही अभिनेते केके गोस्वामी यांनी खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया(A) या पक्षात प्रवेश केला.
खासदार आठवले यांच्या नेतृत्वा खालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया(A) हा सर्वसामान्यांचा व सर्वसामावेशक असा पक्ष असुन आमचा रामदास आठवले यांच्यावर विश्र्वास आहे अशा शब्दात इकबाल दुर्राणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.त्यांना पार्टी तर्फे झारखंड ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.तसेच यावेळी मायावी नगरी या वृत्तपत्राचे संपादक सावन कपूर व मुंबई ग्लोबल या हिंदी वृत्तपत्राचे संपादक राजकुमार तिवारी,कॅांग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते आऱ एन अवस्थी व अभिनेत्री ख्वाहिश यांनी सुदधा आज रिपब्लिकन पक्षात अधीकृत प्रवेश केल्याचे रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष खा रामदास आठवले यांनी एम आय जी क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.
अजय देवगण फुल और काटे ,अक्षय कुमारचा पहिला चित्रपट असलेला सौगंध ,शाहरुख खानचा दिल आशना हेै ,अामिरखानचा आतंक हि आतंक,रानी मुखर्जीचा पहिला चित्रपट मेहेंदी,मामुटी यांचा धरतीपुत्र ईत्यादी ६५ सिनेमांचे लेखन इकबाल दुर्राणी यांनी केले आहे .तसेच खुद्दार ,बेताज बादशहा ईत्यादी चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन केले आहे.
Tuesday, 13 January 2015
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया(A) च्या वतिने“लेट मी फ्लाय” चे आयोजन
पक्षांच्या संरक्षणासाठी जनजाग्रृतीचा नाविन्यपुर्ण उपक्रम
आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया(A) च्या वतिने पक्षाचे जनसंपर्क प्रमुख मयुर बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष्यांच्या संरक्षणासाठी “लेट मी फ्लाय” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पतंग उडवताना वापरलेल्या मांज्यामुळे आकाशात उडणाऱ्या पक्षांचा हकनक बळी जातो. यासाठी जनजाग्रृती होण्यासाठी मुंबई शिवाजी टर्मीनस जवळील सिग्नल जवळ अनेक लहान मुलांनी पक्षांचा वेश परिधान करुन मकरसंक्रांतीच्या लाडुंचे वाटप केले व पतंग न उडवण्याचा किंवा उडवताना न तुटणारा धारदार मांजा न वापरण्याचे आवाहन केले. बऱ्याचदा लहान मुलांचे जीव पतंग उडवताना गेलेच आहेत आता तर मुक्या पक्षांनासुद्धा पतंगाचा त्रास भोगावा लागत आहे. देशात शेकडो पक्षी पतंगांच्या मांजामुळे कापण्याने मरण पावत आहेत. मांजामुळे मेलेले पक्षी कुठेतरी पडतात आणि त्यांची दखल कोणी घेत नाही. काही पक्षी जखमी होऊन पडतात आणि त्यांना अनंत यातना सहन कराव्या लागतात.
पतंग उडवण्यामुळे पक्ष्यांना आणि प्रसंगी माणसांनाहोणा-या त्रासाबद्दल अनेक माध्यमांतून जनजागृतीचे प्रयत्न होत आल्येत. माणसं पतंग उडवायचं थांबायच्या ऐवजी पक्ष्यांना अधिकच घातक ठरणारे मांजे वापरायला लागले आहेत. यासाठी जनजाग्रृती होउन असे प्रकार थांबावेत यासाठी या उपक्रमाचे आयोजन रिपाईच्या वतिने करण्यात आले. यावेळी मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे,अकोला जिल्हाध्याक्ष अशोक नागदीवे,युवक सरचिटणीस सचिन मोहिते व मोठ्या संख्येने पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.
Monday, 12 January 2015
रिपब्लिकन पक्षाच्या वतिने पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन सभा.
१५ जानेवारी रोजी होणार जाहिर अभिवादन सभा.
मुंबई दि.१२ जानेवारी २०१५
पॅंथर नेते पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पक्षनेते मा. खासदार रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि. १५ जानेवारी २०१५ रोजी सायं ५ वा आझाद मैदान येथील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालया समोरील हॉलमध्ये जाहिर अभीवादन सभेचे आयोजन केले असल्याची माहिती आज मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली
दलित पॅंथर या संघटनेच्या निर्मितीतून नामदेव ढसाळ यांनी हजारो तरुणांचा आत्मविश्र्वास जागा केला, अन्याय अत्याचारा विरूद्ध लढण्याची प्रेरणा दिली.नामदेव ढसाळांच्या माध्यमातुन आंबेडकरी साहित्याने मराठी साहित्याच्या बंद दरवाजावर जोरदार धडक मारली.दलित-शोषीतांच्या वेदनांचा आक्रोश कवितेच्या माध्यमातुन जगभर नेला.अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या आठवणी जागवण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत,पत्रकार भाऊ तोरसेकर,अविनाश महातेकर,सुमंतराव गायकवाड,उत्तम खोब्रागडे,तानसेन ननावरे,पी.के.जैन,उमाकांत रणधीर,कमलेश यादव आदी वक्ते उपस्थित राहतील.दिवंगत नामदेव ढसाळ यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान लक्षात घेता रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकत्यांनी प्रचंड संख्येने या अभिवादन सभेस उपस्थित रहावे असे आवाहनही गौतम सोनावने यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.