Saturday, 31 October 2015

Sadguru Shri Wamanrao Pai

कामातुन आनंद देणे व कामातून आनंद मिळवणे हाच खरा कर्मयोग- प्रल्हाद पै


मुंबई दि.११(प्रतिनिधी)- जीवनाचे केंद्र हे मन असुन, थकणे हेच  खरे मनाचे दुखणे आहे असे प्रतिपादन श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी काल मुंबई येथे केले. औचित्य होते  जीवनविद्या मिशन आयोजीत हीरक महोत्सवा अंतर्गत आयोजित लाईफ मॅनेजमेंट सिरिज व्याख्यानमालेचे.  
आजच्या धकाधकीच्या आणि संघर्षमय जीवनात यशस्वी जीवनाकडे वाटचाल करताना करिअर, कुंटुंब, आरोग्य, जीवन आणि पैसा या महत्वाच्या गोष्टींमध्ये समतोल कसा साधायचा व यातून उद्भवणा-या ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयी त्यांनी मार्गदर्शन  केले. मनाला स्थिर कसे करायचे,व्यापक कसे करायचे व वास्तववादाच्या अधीष्टानावर प्रयत्नवादाची कास धरीत विकास कसा साधायचा यासंदर्भात  देखील त्यांनी मार्गदर्शन केले.आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मनाचे सामर्थ ओळखणे व वाढवणे गरजेचे असते असेही ते यावेळी म्हणाले.
दादर मधील योगी सभागृहात हे व्याख्यान ऐकण्यासाठी आलेल्या तीन हजार प्रेक्षक वर्गात अनेक वरिष्ठ अधीकारी व समाजातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थीत होती.
ऑफीसमधील प्रमोशन ते परमेश्वर प्राप्ती पर्यंत सर्व मन प्रसन्न केल्यानेच मिळू शकते तसेच सर्वांप्रती कृतज्ञ राहणे हेच आपल्यातील महत्वाकांक्षेला बळ देत असते असे सांगत कृतज्ञतेचे महत्व त्यांनी सर्वांना पटवून दिले.राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरुवात होउन स्फुर्तीगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.
जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त व सदगुरुं श्री वामनराव पै यांचे सुपुत्र श्री प्रल्हाद वामनराव पै(BTec,Powai,Mumbai,MBA) हे एक आंतरराष्ट्रीय वक्ते व समुपदेशक असुन सदगुरुंच्या महानिर्वाणानंतर श्री प्रल्हाद पै यांच्या सक्षम नेतृत्वाखाली जीवनविद्या मिशनचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.
‘लाईफ मॅनेजमेंच सिरीज’च्या एन्जॉय स्ट्रेस या कार्यक्रमाचा हा सहावा भाग आहे. यापूर्वी ठाणे, सातारा, सांगली, पुणे, गोवा  यासारख्या शहरांमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला असून  मुंबईकरांना याचा लाभ घेता यावा यासाठी हा कार्यक्रम दादर येथील योगी सभागृहात १० ऑक्टोबर २०१५ रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत संपन्न झाला.
सदगुरू श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशनचे कार्य आपल्या भागात सातत्याने आणि निरपेक्षतेने चालू आहे, हे जग सुखी व्हावे व हिंदुस्थान हे राष्ट्र सर्वार्थाने पुढे पुढे जावे, या दिव्य संकल्पापोटी गेली ६० वर्षे जीवनविद्येच कार्य चालू आहे.