“दि.वि. अंर्तयामी
ओलावा असणारे व कार्यकर्ते आणि पत्रकार यांना प्रॊत्साहन देणारे
होते” असे उदगार श्री विनय
सहस्त्रबुद्धे यांनी काल मुंबई पत्रकार संघात काढले, औचित्य होते पत्रकार
दि.वि.गोखले व्यक्तित्व व कर्तुत्व या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे. मराठीत
युद्धशास्त्र विषयक पत्रकारितेचा पायंडा पाडणाऱ्या दि.विं. वरील पुस्तकाचे संपादन
त्यांच्या शिष्या व जेष्ठ पत्रकार नीला उपाद्धे यांनी केले.
आपण ज्यांच्या खांद्यावर
उभे आहोत त्यांना विसरण्याचा रोग फैलावत असताना या पुस्तकाच्या निर्मिती बद्दल
आनंद होत आहे अश्या भावना डॉ. हर्डिकर यांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमात दि.विं
चे अत्यंत जवळचे मित्र ज.द. जोगळेकर उपस्थित होते.92 वर्षाच्या जोगळेकरांनी दि.वि.
सोबतच्या अनेक आठवनींना उजाळा दिला.पत्रकार म्हणुन उमदेपण असलेला व कोणालाही मदत करणारा जेष्ठ सहकारी अशी त्यांची
ओळख होती असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष अरूण टिकेकर यांनी केले.या नंतर
निमंत्रितांचे मान्यवरांच्या हस्ते तुलसी वंदावन,शाल व श्रीफळ देउन सत्कार करण्यात
आला.